“हनीट्रॅप”मध्ये अडकला बँकेच्या अधिकारी ; ३० लाख …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- नामांकित बँकेच्या अधिकाऱ्याला “हनीट्रॅप”मध्ये अडकवून ३० लाख रुपये उकळल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढव्यात नुकतेच पनवेलच्या तरुणाला लुटण्यात आले होते.

त्यामुळे पुण्यात “हनीट्रॅप” टोळी असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. यानुसार एका महिलेसह ५ जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विमानगर येथील एका बँकेत अधिकारी आहेत.

दरम्यान तरुणीने त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यांच्याशी बोलत त्यांना प्रेमाचे नाटक केले व त्यांची पूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांना नारायण गाव येथे बोलवून घेतले व अज्ञातस्थळी नेले. त्याठिकाणी या तरुणीने तिच्या इतर चार साथीदारांना नातेवाईक म्हणूम बोलावले.

ते आले असता त्यांना तरुणीने तक्रारदार यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे एकाने तक्रारदार यांच्या गळ्याला कुर्हाड लावत धमकावले. तसेच ठार मारण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर ३० लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना सोडून देण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24