Bank Work : नागरिकांनो लक्ष द्या ! बँकेशी संबंधित काम येत्या 24 तासांत करा पूर्ण नाहीतर ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Work : येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुमचे देखील बँकेत काम असेल तर तो काम तुम्ही येत्या 24 तासांत पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला त्या कामासाठी 21 नोव्हेंबर म्हणजेच सोमवारची वाट पाहावी लागेल.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो येत्या शनिवारी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या संपूर्ण कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शनिवारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने नोकऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ संप पुकारला आहे आणि साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी बँका बंद राहणार आहेत.म्हणून जर तुमचे देखील काही काम बँकेत असेल तर ते येत्या 24 तासांत पूर्ण करून घ्या.

संपाबद्दल माहिती देताना एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले कि संपाचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. अधिकारी वर्ग या संपात सहभागी होणार नसला तरी बँकांमधील ठेवी, पैसे काढणे, चेक क्लिअरिंगवर परिणाम होऊ शकतो.

संपाचे कारण

वेंकटचलम म्हणाले की, काही बँकांच्या नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि त्यांच्या ठेवींना धोका निर्माण करू शकते. ते म्हणाले की काही बँका औद्योगिक विवाद (दुरुस्ती) कायद्याचेही उल्लंघन करत आहेत. ते पुढे म्हणाले की, कामगार अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केलेल्या प्रकरणांमध्येही व्यवस्थापन सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आहे. व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची जबरदस्तीने बदली केली जात आहे.

बँकांनी ग्राहकांना कळवले आहे

बँक ऑफ बडोदा आणि पंजाब अँड सिंध बँकेसह अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना 19 नोव्हेंबर रोजी संप झाल्यास सेवांवर होणार्‍या परिणामाबद्दल आधीच माहिती दिली आहे. संप असेल तर बँकेचे कर्मचारी त्यात सहभागी होऊ शकतात, असे पंजाब अँड सिंध बँकेने सांगितले. अशा स्थितीत बँकेच्या शाखा किंवा कार्यालयातील सामान्य कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील बँकांना याचा फटका बसणार नाही.

हे पण वाचा :- Airtel 5G : प्रतीक्षा संपली! आता ‘या’ शहरातही Airtel 5G सेवा होणार सुरु ; पहा संपूर्ण लिस्ट