Banks Holiday :- मार्च महिन्यात महाराष्ट्रात आठ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे.
मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.
अशी असणार आहे सुट्ट्यांची यादी –
१ मार्च: महाशिवरात्रीमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
६ मार्च: रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.
१२ मार्च: दुसरा शनिवार
१३ मार्च: रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील.
१८ मार्च: धुळीवंदन असल्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद असतील.
२० मार्च: रविवार असल्याने सुट्टी आहे.
२६ मार्च: चौथा शनिवार
२७ मार्च: रविवार असल्याने बँका बंद असतील.