बँकांनी स्वखर्चाने कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनने जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकाकडे कर्मचार्‍यांकरीता बँकच्या खर्चाने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली.

केंद्र सरकारने नुकतेच बँक कर्मचार्‍यांना कोरोना योद्धे म्हणून घोषित केले आहे. बँकिंग सेवा हि अत्यावश्यक सेवा आहे. या सेवा प्रकारात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे बँक कर्मचार्‍यांना दडपणाखाली काम करावे लागत आहे.

या बाबींचा विचार करून बँकांनी आपापल्या बँक कर्मचार्‍यांकरीता कोरोना लसीकरण मोहिम राबवावे. जेणेकरून ग्राहकांना सेवा देताना कर्मचार्‍यांवर दडपण राहणार नाही.

सर्व बँकांचे व्यवस्थापन कर्मचार्‍यांच्या हिताकरीता नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे लसीकरण करतील अशी आशा युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी व्यक्त केली.

या मागणीचे निवेदन जिल्ह्या सहकारी बँक, अ.नगर मर्चंटस बँक, शहर बँक, अंबिका महिला बँक, संगमनेर मर्चंटस बँक, कोपरगाव पिपल्स बँक, भिंगार बँक आदि बँकांना देण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24