February 2023 Bank Holidays List : पुढच्या महिन्यात ‘इतके’ दिवस बंद असणार बॅँका, पहा सुट्ट्यांची यादी

Published by
Ahmednagarlive24 Office

February 2023 Bank Holidays List : सर्वसामान्यांच्या जीवनाची बँक ही एक अविभाज्य घटक बनली आहे. त्यात अनेकांकडे इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंग आहे. त्यामुळे त्यांची कामे सहज आणि लवकर होतात. तरीही अनेकदा आपले बँकेत एखादे महत्त्वाचे काम निघते.

त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ती बँक चालू आहे की बंद ते माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. लवकरच नवीन वर्षातील दुसरा महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या महिन्यात बँक एकूण किती दिवस बंद असतील ते जाणून घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

पहा सुट्ट्यांची यादी

5, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी बंद राहणार बँक

5 फेब्रुवारीला रविवार आहे त्यामुळे देशभरात बँकांना सुट्टी असणार आहे. तसेच 11 रोजी दुसरा शनिवार आणि 12 फेब्रुवारी रोजी रविवार आहे त्यामुळे त्यादिवशीही देशभरातील बँका बंद राहतील.

15 आणि 18 फेब्रुवारी रोजी बंद राहणार बँक

15 फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये लुई-नगई-नीमुळे आणि 18 तारखेला शिमला, लखनौ, हैदराबाद, कानपूर, मुंबई, अहमदाबाद, नागपूर, रायपूर, रांची, तिरुअनंतपुरम, बेलापूर आणि बेंगळुरू येथे महाशिवरात्री असल्यामुळे बँक बंद राहील.

19, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी बंद राहणार बँक

19 फेब्रुवारी रोजी रविवार आहे त्यामुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 25 तारखेला चौथा शनिवार आहे तसेच 26 रोजी रविवार आहे त्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

20 आणि 21 फेब्रुवारी रोजी बंद राहणार बँक

अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये 20 रोजी राज्य स्थापना दिनानिमित्त बँक बंद असेल. तर सिक्कीममध्ये 21 तारखेला लोसारच्या निमित्ताने बँका बंद असणार आहेत.

Ahmednagarlive24 Office