अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- जर तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते उद्याच अर्थात सोमवारीच म्हणजे 12 एप्रिल रोजी निकाली काढा कारण आठवड्याचे बहुतेक बँक दिवस बंद राहणार आहेत आणि उद्या नंतर 17 एप्रिल रोजी बँका उघडल्या जातील.
तथापि, एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मध्यवर्ती बँक आरबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या सुट्यांच्या यादीमध्ये काही सुट्टी अशा आहेत की त्या स्थानिक राज्य पातळीवरच दिल्या जातात. उदा.14 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमध्ये बँकेची सुट्टी आहे,
परंतु दिल्ली आणि मध्य प्रदेश-छत्तीसगडसह काही राज्यात बँका खुल्या असतील. पुढील 10 दिवसांत बँका चार दिवस बंद राहतील आणि 12 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान बँका केवळ 12,17, 19 आणि 20 एप्रिल रोजी उघडतील.
पुढील 10 दिवसांच्या बँक सुट्टीची यादी :?-
- 13 एप्रिल – मंगळवार – उगाडी उत्सव, तेलगू नववर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, वैशाखी, सजीबु नोंगामपांबा (चैरोबा), नवरात्रांचा पहिला दिवस (बेलापूर, बेंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर मधील सुट्टी .)
- 14 एप्रिल – बुधवार – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती / तामिळनाडू वार्षिक दिवस / विशु / बिजू महोत्सव / चेईराओबा / बोहाग बिहू (आयजाल, भोपाळ, चंदीगड, नवी दिल्ली. रायपूर, शिलांग आणि शिमला येथे खुले असतील.)
- 15 एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, बोहाग बिहू, बंगाली नववर्ष, सरहुल (अगरतला, गुवाहाटी, कोलकाता, रांची, शिमला येथे सुट्टी)
- 16 एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू (गुवाहाटीमध्ये बँक बंद)
- 18 एप्रिल – रविवार (साप्ताहिक )
- 21 एप्रिल – बुधवार – राम नवमी, गड़िया पूजा (अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला येथे बँक हॉलिडे)