अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- पत्नीला मारहाण करत असताना मध्ये आलेल्या सासूला देखील जावयाने लोखंडी हातोड्याने जबर मारहाण केली आहे. ही घटना निलंगा तालूक्यातील माकणी येथे घडली आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता बालाजी सुर्यवंशी (रा.माकणी ता.निलंगा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी पुजा हिचे लग्न गावातीलच दत्तात्रय चंदर बामणे यांचेशी झाले आहे.
मुलीच्या घराचे सध्या बांधकाम चालु असल्याने जावाई दत्तात्रय चंदर बामणे आणि मुलगी पुजा व नातु हे फिर्यादीच्या घरीच राहात होते.
मुलगी व जावई यांच्यात काही वाद झाले त्यानंतर जावाई मुलीस हातोडयाने मारहान करत होता, मुलीच्या डोक्यात कानाखाली गंभीर दुखापत लागुन रक्त निघत होते, त्यामुळे फिर्यादीने जावायास का मारत आहेस असे विचारत असताना त्याने फिर्यादीच्या कानावर हातोडयाने मारहान केली.
त्यात कानाची नस देखील तुटली आहे. मारहाण केल्यानंतर तो गाडीवर बसुन निघुन गेला. जखमींना उपचारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दत्तात्रय याच्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.