अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- गुगलने अलीकडेच प्ले स्टोअर वरून 164 मोबाइल अॅप्स हटविले आहेत. हे अॅप्स एक करोड़ हून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. कंपनीने या अॅप्सना CopyCatz म्हणून वर्णन केले आहे जे इतर अॅप्सच्या कॉपी आहेत आणि डाउनलोडनंतर यूजर्सना जाहिराती पहाव्या लागतात.
हे अॅप्स मैलिशियस आहेत आणि यूजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा खराब करू शकतात. कंपनीने रिमूव केलेल्या 164 अॅप्सपैकी असे 37 अॅप्स सर्वाधिक डाउनलोड केले गेले आहेत, जे तुम्ही त्वरित डिलीट करावेत. तर मग जाणून घेऊया ते अॅप्स कोणते आहेत …
हे 37 अॅप्स करा डिलीट –
फोनमध्ये जाहिरातीचा होईल भडीमार जानेवारीच्या उत्तरार्धात, व्हाईट ऑपरेशन सॅटोरी थ्रेट इंटेलिजेंस अँड रिसर्च टीमने या 164 अॅप्स बद्दल असे आढळले की ते com.tdc.adservice पॅकेज अंतर्गत अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अवांछित जाहिराती पाठवत होते.
अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच गुगलने हे अॅप्स रिमूव केले होते. सायबर हल्ल्यांसह लाखो अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप्स धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत आपण असे अॅप्स डाउनलोड केला असेल आणि अद्याप हटविला नसेल तर तो हटवा.
लोकप्रिय अॅप्सच्या नावाचा करत होते वापर –
या अॅप्सनी लोकप्रिय अॅप्सचे नाव आणि डिस्क्रिप्शन वापरले आणि वापरकर्त्यांनी हे डाउनलोड करताच त्यांनी त्या वापरकर्त्यांच्या फोनवर अनवॉन्टेड जाहिराती पाठविणे सुरू केले. या जाहिराती वापरकर्त्यांच्या फोनसाठी आणि त्यातील डेटासाठी धोकादायक ठरू शकतात.