IRCTC luggage Rules : इतर सर्व वाहनांपेक्षा रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चिक असतो. तसेच रेल्वेचा प्रवास हा खूप आरामदायी असतो. त्यामुळे देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते.
तसेच काही कडक नियम नियम लागू करत असते. परंतु, याची माहिती खूप कमी प्रवाशांना असते. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत नियम मोडून त्यांना दंड भरावा लागतो. अशातच रेल्वेने आता सामानाशी निगडित काही नियम बनवले आहेत. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.
‘सामान जास्त असेल तर प्रवासाची मजा अर्धी!
रेल्वे मंत्रालयाकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रवाशांना ट्रेनमध्ये जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रालयाने ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘सामान जास्त असेल तर प्रवासाची मजा अर्धी! जास्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जास्त सामान असेल तर, पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करा.
किती सामान नेता येते?
एसी फर्स्ट क्लासमध्ये, 70 किलोपर्यंत मोफत परवानगी आहे . तर एसी 2-टियरसाठी मर्यादा 50 किलो आहे. एसी 3-टियर स्लीपर, एसी चेअर कार आणि स्लीपर क्लासमध्ये 40 किलोपर्यंत सामान ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या श्रेणीसाठी, ही मर्यादा 25 किलोपर्यंत आहे. सामानासाठी किमान शुल्क 30 रुपये इतके आहे. 70-80 किलोपर्यंतचे अतिरिक्त सामान नेण्यासाठी प्रवाशांना आता त्यांचे सामान बुक करून अतिरिक्त पैसे द्यावे लागतात .