अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- देशात कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेकजण घरीच बसून आहे. यामुळे विरंगुळा तसेच करमणूक म्ह्णून अनेक जण तासंतास मोबाईलमध्ये अडकून पडलेले असतात.
मात्र काही काळाने आपला मोबाईल स्लो चालत असल्याचे अनेकवेळा तुमच्यासोबत घडले असेल. मोबाईल स्लो चालत असला म्हणजे नक्कीच आपल्या मोबाईलमध्ये काही व्हायरस तर शिरला नाहीना असा संशय आपल्या मनात तयार होऊ लागतो.
यातच आपल्या स्मार्टफोन मध्ये व्हायरस आहे कि नाही हे कसे ओळखायचे याबातची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत…. जर तुमचा फोन अतिशय हँग होत असेल किंवा अतिशय स्लो झाला असेल, तर फोनमध्ये व्हायरस असल्याचा धोका असू शकतो.
व्हायरस त्याच्या कामासाठी मेमरी आणि CPU चा उपयोग करतो, ज्यामुळे CPU सतत काम करत राहतो आणि Apps योग्यरित्या काम करत नाहीत. जर स्मार्टफोन अधिक डेटाचा वापर करत असेल, तर ते व्हायरस असल्याचं कारण असू शकतं.
व्हायरस युजरच्या डेटा सर्व्हरवर अपलोड करत असतो, त्यामुळे इंटरनेटचा अधिक वेगात वापर होतो. जर फोनचं इंटरनेट, WiFi आपोआप ऑन-ऑफ होत असेल, तरीही हा फोनमध्ये व्हायरस असल्याचा संकेत ठरू शकतो.
ब्राउजिंग करताना अनेक ठिकाणी अॅड्स येतात. परंतु जर तुमच्या स्मार्टफोनच्या होम स्क्रिनवर किंवा इतर ठिकाणी अश्लील जाहिरात येत असेल, तर हे फोनमध्ये व्हायरस असल्याचं कारण ठरू शकतं.
अनेकदा ब्राउजिंग करताना काही लिंक्सवर क्लिक केल्यानंतर, एक नवीनच पेज ओपन होतं आणि तुमच्या फोनमध्ये व्हायरस असल्याचं सांगत, तो क्लियर करण्याचं सांगितलं जातं. असे पेज लवकरात लवकर बंद करावेत. यामुळे फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोका वाढतो.
जर तुमच्या फोनवरुन आपोआप Unknown कॉल्स किंवा मेसेज जात असतील, तरीही हा व्हायरस असल्याचा धोका असू शकतो. अनेकदा व्हायरस डेटा पाठवण्यासाठी इंटरनेटचा वापर न करता मेसेज किंवा कॉलची मदत घेतो.