अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करुन पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तात्काळ कोठे तक्रार करायची याची पूर्ण माहिती नसते.
त्यामुळे नागरिकांना सायबर पोलिसांपर्यंत पोहचेपर्यंत चोरटे तातडीने पैसे त्यांच्या बँक खात्यातून/वॉलेटमधून काढून घेतो. यामुळे नागरिकांप सावधान पायथा आपलीही फसवणूक होऊ शकते.
आजकाल वैयक्तिक माहिती अपडेट (केवायसी) करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार बँक अथवा कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत बँकेतील पैशांवर डल्ला मारत आहेत. गेल्या वर्षभरात ओटीपी शेअर व केवायसीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीसंदर्भात येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये साडेतीनशे तक्रारी दाखल आहेत.
मोबाईलचे सीमकार्ड अपडेट करणे, फोन-पे, गुगल-पे ला बँक खाते जोडणे, एटीएम, क्रेडिट कार्डचे नूतनीकरण तसेच बँक खात्याशी आधारकार्ड, पॅनकार्ड लिंक करणे आदी कारणांसाठी फसवणूक करणारे आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात.
व आपल्याकडून आपली खासगी माहिती संकलित करतात. व सायबर ठग खात्यातून ऑनलाईन पैसे चोरतात. काहीवेळेस फोन-पे, गुगलपेच्या माध्यमातूनही क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून फसवणूक केली जाते.
पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. नागरिकांनी कोणाचेही सांगण्यावरुन कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये.
मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट, डेबीट कार्डची माहिती शेअर करु नये. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.