अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेचा पोलिसांकडूनही गांभीर्याने तपास होताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे.
कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील सावेडी उपनगरामधील गोल्डन जीमच्या वाहनतळावरून विवेक विठ्ठल त्रिंबके (वय 37 रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांची बुलेट दुचाकी (एमएच 16 सीटी 4727) चोरीला गेली.
त्रिंबके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दिल्लीगेट वेशीजवळील सुपेकर मेडिकल समोरून साईनाथ नागनाथ ढोले (वय 25, रा. ब्राह्मगाव, जि. यवतमाळ, हल्ली रा. सुपेकर मेडिकलवरती, दिल्लीगेट) यांची दुचाकी (एमएच 29 बीएस 7587) चोरीला गेली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अर्बन बँक शाखेसमोरून विद्यार्थ्यांच्या दुचाकीची चोरी झाली.
प्रवीण विश्वनाथ बुलाखे (वय 22 रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) यांची दुचाकी (एमएच 16 सीजे 5135) अर्बन बँकेसमोर लावली होती. चोरट्यांनी ही दुचाकी चोरली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील अभय अपार्टमेंटमध्ये लावलेली निता संतोष पिपाडा (वय 52) यांची दुचाकी (एमएच 16 बी एक्स 7779) चोरट्यांनी मंगळवारी रात्रीतून चोरून नेली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.