अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार परत एकदा वेगात वढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने परत एकदा कोरोनापासून बचावासाठी विविध नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र तरीदेखील अनेकजण विनामास्क फिरत होते. अशा तब्बल १३९ जणांवर आज पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
त्या अनुषंगाने कोरोनाला अटकाव आणन्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ खातेप्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे, गर्दी न करणे,सोशल डिस्टसिंगचे पालन आदी नियमांचे पालन करण्याचे बंधनकारक असल्याचे सुचित केले आहे.
तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानूसार पोलिसांनी पुणे ,माळीवाडा व तारकपूर बस स्थानक परिसरात विनामास्क फिरणाऱ्या १३९ इसमांवर कारवाई करुन सुमारे १३९०० रूपयांचा दंड वसुल केला आहे.
जिल्ह्यात शासकीय, खासगी, अस्थापनांच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी, बसस्टँड, रेल्वे स्थानक,मॉल्स, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी टिकाणी विनामास्क अथवा सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांसह मंगल कार्यालये,लॉन्स चालकांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक केले आहे.
अथवा संबंधितांना नोटीसा देवून कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी ,तसेच मंगल कार्यालये,लॉन्स आदी ठिकाणी गर्दी करू नये व विनामास्क फिरू नये असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.