अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- पैसे, संपत्ती, प्रॉपर्टी, शेतजमीन, जागा यावरून अनेकदा वादाच्या घटना घडलेल्या आहेत. अशाच घटना आजकाल वाढू लागल्या आहेत. नुकतीच असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडलेला दिसून आला आहे.
शेतातील बांधाच्या वादावरून पाच जणांनी तिघा जणांना लाथा बुक्क्यांनी, लोखंडी अँगलने तसेच लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार देवळाली प्रवरामध्ये घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रंजना शिवदास मोरे (रा. देवळाली प्रवरा) या त्यांच्या शेतात होत्या. यावेळी आरोपी शेतातील सामायिक बांधावर लोखंडी अँगलने तार कंपाउंड करीत होते. फिर्यादी रंजना मोरे म्हणाल्या, शेताची मोजणी झाल्यानंतर तुम्ही तार कंपाउंड करा.
याचा आरोपींना राग आला. त्यांनी मोरे व त्यांचे पती आणि मुलास शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी, लोखंडी अँगलने तसेच लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
रंजना शिवदास मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी भीमराज भागवत शेटे, विनोद भीमराज शेटे, उषा भीमराज शेटे, सोनाली विनोद शेटे (रा. देवळाली प्रवरा), राहुरी शहरातील एक व्यक्तीसह पाच जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.