अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- गाया घेण्यासाठी दिलेल्या पैश्याच्या मागणीवरून पाच जणांनी लाठ्या काठ्याने मारहाण करून महिलेला जबर जखमी केले असल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणी घडली.
या मारहाण प्रकरणी फिर्यादी सुलभा कळमकर यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे उसन्या दिलेल्या पैश्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद होऊन तुम्ही दिलेल्या पैशाची मागणी लोकांसमोर का करता आम्हाला काही इज्जत नाही का असे म्हणून सुलभा सदाशिव कळमकर यांना मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी सुलभ कळमकर यांच्या फिर्यादीवरून बापू पोपट कळमकर ,शरद पोपट कळमकर, पोपट भिवा कळमकर, रतनबाई कळमकर,
वर्षा बाळू कळमकर (सर्व रा. कळमकर वाडी, घारगाव) यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक ज्ञानेश्वर पठारे करत आहेत.