रूग्णालयात जाणार्‍या महिलेस मारहाण करत केला विनयभंग!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- उपचार घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात जाणार्‍या एका३० वर्षीय महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री बोल्हेगाव परिसरात स्मशानभुमीजवळ ही घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बोल्हेगाव परीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी पीडित महिलेच्या पोटात दुखत असल्याने मंगळवारी रात्री ती उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जात होती.

बोल्हेगाव स्मशानभुमीजवळ आरोपीने त्या महिलेस अडविले व तोंड दाबून मारहाण करत गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत महिलेने रात्रीच तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन संबंधिता विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक एच. एम. आव्हाड करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24