किरकोळ कारणावरून मारहाण; सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- किरकोळ कारणावरून पोहेगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात सरपंचांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले.

दरम्यान या मारहाणी प्रकरणी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन भानुदास औताडे यांच्यासह त्यांचा मुलगा ऋत्विक औताडे, पोहेगावचे सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे, तुषार भानुदास औताडे या चौघांवर शिर्डी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. याबाबत नानासाहेब माधवराव औताडे यांनी शिर्डी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मी हॉटेलवर असताना लहान भाऊ किरण याचा फोन आला. तू ताबडतोब जय किसान पेट्रोल पंपाजवळ ये, मी त्या ठिकाणी गेलो असतात माझा भाऊ व वडील यांना नितीन भानुदास औताडे व ऋत्विक नितीन औताडे शिवीगाळ करून दमदाटी करत होते.

त्यावेळी सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे व तुषार भानुदास औताडे आले त्यांनी आम्हाला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच नितीन औताडे यांनी लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारहाण केली. त्यात माझा हात मोडला आहे. तसेच तुषार औताडे याने माझ्या वडिलांचे पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करून वाईट शिवीगाळ केली.

जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आई मंदाबाई माधवराव औताडे आम्हाला सोडवण्यासाठी आली असता नितीन औताडे यांनी तिला वाईट शिवीगाळ करून ढकलून दिले. याप्रकरणावरून नानासाहेब माधवराव औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील चारही आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान ऋत्विक औताडे यांनी दुसरी फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे, दोन महिन्यापूर्वी नानासाहेब माधव औताडे यांनी चुलते सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे

यांना ग्रामपंचायत मधील दारू बंदीच्या मिटिंगमध्ये मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याठिकाणी किरण औताडे, नानासाहेब औताडे, माधव औताडे, मंदाबाई औताडे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. त्याचवेळी चूलते अमोल औताडे हे त्याठिकाणी आले असता

नानासाहेब औताडे व किरण औताडे यांनी चुलते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी नानासाहेब औताडे यांनी त्याच्या खिशातील चाकु काढुन चुलते अमोल औताडे औताडे यांच्या डाव्या हातावर वार केला. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24