अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या फिर्यादीवरून धीरज पानसंबळ याच्यावर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणारा पानसंबळ हा राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. शुक्रवारी सकाळी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर मारहाणीची ही घटना घडली. कृषी विद्यापीठातील कर्मचारी शरद शिरसाठ यास डाॅ. नंदू काशिराम भुते यांनी तू कुणाला विचारून काम सोडून गेला होता.
असे विचारले असता या कामगाराबरोबर असलेला धीरज पानसंबळ याने तो माझ्या बरोबर आल्याचे सांगून डाॅ. भुते यांना शिवीगाळ तसेच मारहाण केली. डाॅ. भुते यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने धीरज पानसंबळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.