अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली.
ही आत्महत्या वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. यामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून दोषीवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागुन राहीले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी उपकेंद्रातच छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली. डॉ. शेळके ड्युटीवर आले त्यानंतर काही वेळाने त्यांना तिसगाव येथे बोलावण्यात आले होते. यामुळे ते तिसगाव येथे गेले होते. तेथून परत करंजी उपकेंद्रात आले असता ते तणावाखाली असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी सहकारी कर्मचार्यांनी डॉ. शेळके यांना धीर देत ताणतणाव घेऊ नका, नोकरीमध्ये असे चालुच असते, असे सांगत डॉ. शेळके यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर डॉ. शेळके यांनी कागद व पेन घेत टॅब जमा करा. मी राजीनामा देणार असल्याचे सांगत दालनात गेले. त्यांनी आतून दरावाजा लावून घेतला.
त्यानंतर दोन लसीकरण केल्यानंतर नर्सने जेवनासाठी डॉ. शेळके यांना आवाज दिला. मात्र आतुन आवाज येत नाही म्हणुन दरवाजा वाजवला. पण आतुन कोणताही आवाज आला नाही. म्हणुन फोन लावला तर फोनही उचलला नाही म्हणुन सर्व नर्स सेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला व खिडकीतुन पाहीले तर डॉ. शेळके यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला दोरी लावुन गळफास घेतल्याचे दिसून आले.
डॉ. गणेश शेळके यांनी लिहिलेली सुसाईड नोट –
मी डॉ. गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरीक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे, या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे.
सही/-
अशी सुसाईट नोट सापडली असून त्यामध्ये वरीष्ठ अधिकार्यांची नावे असल्याने आरोग्य विभाग व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. गणेश शेळके यांचे पार्थिव उच्यस्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहे. या प्रकारणी गुन्हा नोंदवण्यात येत असुन पो. कॉ. सतीश खोमने व अरविंद चव्हाण, भाउसाहेब तांबे व सपोनि कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.