महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गोमांसाची तस्करी सुरूच; पोलिसांनी केली कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.

वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.

दरम्यान नुकतेच संगमनेर पोलिसांनी शहरात एका ठिकाणी कारवाई केली आहे. यामध्ये गोवंश जातीच्या जनावराचे कत्तल केलेले मांस विक्री करत असताना आढळल्याने पोलिसांनी कत्तलखाना परिसरातून तीन लाख रुपये किमतीचे पंधराशे किलो गोमांस जप्त केल्याची घटना शहरांमधील जमजम कॉलनी परिसरातील कुरेशी वाडा येथे घडली आहे.

या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की शहरातील जमजम कॉलनी येथे एका कत्तलखान्या मध्ये गोमास विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली असता पोलिसांनी रात्री या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता.

जाहीर अन्वर कुरेशी हा गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई सुरू करताच त्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

पोलिसांनी पकडलेल्या माणसाच्या पंचनामा केला याबाबत पोलिस कॉन्स्टेबल न्यानेश्वर सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी जाहीर कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास पोलिस नाईक लबडे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24