अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे.
यातच करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे.
यापुढे भाविकांना साईंचे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्री ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे.
तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत सुरु राहील याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी.
असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
त्यांअनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवु नये म्हणुन संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्रौ ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे.
दरम्यान भाविकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करुन साईबाबा संस्थानला सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.