बँकेत एफडी करण्यापूर्वी लक्षात ठेवा श्रीमंतांची ‘ही’ 7 सूत्रे ; होईल फायदाच फयदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- बँक फिक्स्ड डिपॉझिट भारतातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय ठेव योजना आहे. यात बँक 1 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.50 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर देतात.

एफडी वर मिळणारा व्याज दर या ठेव योजनेची लोकप्रियता ही सुरक्षित स्वरुपाची असते. यामध्ये गुंतवणुकीवर निश्चित वेळेत व्याज मिळतो. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे वाढतच जातात. परंतु एफडी घेताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपले नुकसान होऊ शकते. म्हणूनच एफडीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

1) बँकेची विश्वासार्हता – एखादी निश्चित ठेव करण्यापूर्वी बँकेची विश्वासार्हता तपासा. DICGC च्या डिपॉझिटरी विमा कार्यक्रमांतर्गत एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याअंतर्गत 5 लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही बँकेचे क्रेडिट रेटिंग तपासा. तज्ज्ञांचे माहितीनुसार, एफडीमध्ये सर्व पैसे गुंतवण्याऐवजी गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करावी.

2) किती वर्षांसाठी करावी एफडी मुदत :– ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा कार्यकाळ निश्चित करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. कारण जर गुंतवणूकदार मॅच्युअर होण्यापूर्वी रक्कम मागे घेत असेल तर त्यांना दंड भरावा लागेल. एफडी तोडण्यापूर्वी त्याला ब्रेकिंगवर 1% दंड भरावा लागेल. यामुळे ठेवींवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते. म्हणूनच आपण न विचार करता कार्यकाळ निवडल्यास आपण अडचणीत येऊ शकता. उच्च व्याजांच्या लोभासाठी दीर्घ मुदतीची एफडी टाळावी.

3) एकाच FD मध्ये सगळे पैसे लावू नका :- जर तुम्ही एका बँकेत एकाच एफडीमध्ये 10 लाख रुपये गुंतविण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये 1 लाख रुपयांच्या 9 एफडी आणि 50,000 रुपयांच्या 2 एफडी गुंतवणूक करा. जर आपल्याला या दरम्यान पैशांची आवश्यकता लागल्यास आपल्या गरजेनुसार आपण त्या दरम्यानची एफडी तोडून पैशांची व्यवस्था करू शकता. आपली उर्वरित एफडी सुरक्षित असेल.

4) टॅक्स :- तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज मिळकत आयकर स्लॅबनुसार आकारली जाते. आर्थिक वर्षात एफडीवर मिळणारे व्याज 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या व्याजावर टीडीएस कपात केली जाते. मिळवलेल्या एकूण व्याजापैकी हे 10% असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे. तथापि, जर आपले उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी असेल तर आपण एफडीवर टीडीएस कपात करण्यास परवानगी न देण्यासाठी फॉर्म 15 जी आणि फॉर्म 15 एच बँकेत सादर करू शकता.

5) व्याज विड्रॉल :- बँकेत पूर्वी त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर व्याज काढून घेण्याचा पर्याय होता, आता काहीजण बँकेत मासिक पैसे काढू शकतात. आपण आपल्या गरजेनुसार ते निवडू शकता.

6) एफडीवरील कर्जाचे व्याज दर देखील पहा :- तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज घेऊ शकता. त्याअंतर्गत तुम्ही एफडीच्या 90 टक्के मूल्यापर्यंत कर्ज घेऊ शकता. समजा तुमची एफडी 1.5 लाख रुपये असेल तर तुम्हाला 1 लाख 35 हजार रुपये कर्ज मिळू शकेल. जर तुम्ही एफडी वर कर्ज घेतले तर तुम्हाला ठेवीवरील व्याजापेक्षा 1-2% जास्त पैसे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला ते 6 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकेल. कोणती बँक कोणत्या व्याज दरावर कर्ज देते ते तपासून घ्या .

7) कर्ज- फिक्स्ड :- डिपॉडिटद्वारे काही गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा दिली जाते. त्यामुळे याचा फायदा कर्ज घेतेवेळी मिळतो. एखाद्या आर्थिक परिस्थितीत एखादी व्यक्ती त्याच्या ठेवीच्या 90 टक्के पर्यंत एफडीवर कर्ज घेऊ शकते. कर्जाची मुदत एफडी योजनेच्या जास्तीत जास्त कालावधीपर्यंत असू शकते. कारण जास्तीत जास्त कालावधीचा एफडी जास्तीत जास्त कालावधीपुरता मर्यादित असेल.