PM Kisan : 13 व्या हप्त्यापूर्वी ‘त्या’ 21 लाख शेतकर्‍यांना बसला धक्का, जाणून घ्या नेमकं कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवते. यापैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान सम्मान निधि योजना होय. दरम्यान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने बाराव्या हप्त्याचे पैसे जमा केले होते.

लवकरच त्यांना तेरावा हप्ता मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी एक दुःखद बातमी समोर आली आहे. 13 व्या हप्त्यापूर्वी 21 लाख शेतकर्‍यांना धक्का बसला आहे.  शेतकऱ्यांना आतापर्यंत 12 हप्त्यांचा लाभ मिळाला असून, त्यांची आता पुढील हप्त्याची प्रतीक्षाही संपणार आहे.

मात्र अगोदरच सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. केंद्र सरकारने काही अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे.

या शेतकऱ्यांना आता हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.13 वा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल. याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा केला आहे.

हे शेतकरी राहतील 13 व्या हप्त्यापासून वंचित

या योजनेच्या 13 व्या हप्त्याचे जानेवारीमध्ये पैसे पाठवले जाणार असून अपात्र शेतकरी यापासून वंचितराहतील. अपात्र असलेल्या 21 लाख शेतकर्‍यांची यादी केली आहे.

त्यामुळे आता या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे. त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम परत करावी लागणार आहे. तसेच यांनी पैसे परत केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी मिळतो लाभ

या योजनेअंतर्गत खात्यात 2,000 रुपयांचे तीन हप्ते पाठवले जातात. प्रत्येक चौथ्या महिन्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये सरकार खात्यात टाकते. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.