अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी आरक्षित असेलल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे
या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ केसकर यांनी त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्यासह उपोषण सुरु केले होते.
सविस्तर प्रकरण असे कि, तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी शासनाने स्मशानभूमीसाठी ५ आर. क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तरीही येथे दफनविधी करू दिला जात नाही.
गेली ४५ वर्षे झाली तरी संबंधित जमीन मालक या लोकांना या जागेमध्ये येऊ देत नाही. अनेक वेळेस शासन दरबारी हा प्रश्न मांडला असून शासनानेही कोणतीच दखल घेतलेली नाही.
त्यामुळे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण केले, असे केसकर यांनी सांगितले. दरम्यान स्मशानभूमीत झालेले अतिक्रमण काढले जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.