लग्नाची मागणी करणार्‍या प्रियसीला प्रियकराकडून मारहाण; प्रियकरासह 10 ते 11 जणांविरूध्द गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- प्रेमसंबंध असल्याने युवतीने प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली. प्रियकराला याचा राग आला आणि त्याने 10 ते 11 जणांना सोबत घेत युवतीला लाथाबुक्क्याने मारहाण केली.

शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण झालेल्या युवतीने फिर्याद दिली आहे.

मयुर शाम साठे (रा. नालेगाव, अहमदनगर), अमोल गोरे, अदित्य गवळी, प्रकाश उमाप, महेश भोर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व इतर पाच ते सहा जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आह.

रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान भिंगारमध्ये ही घटना घडली. फिर्यादी युवती व मयुर साठे यांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. त्यामुळे युवतीने मयुरकडे लग्न करण्याची मागणी केली.

यावरून त्यांच्यात वाद झाले. मयुरने इतरांना बोलवून युवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. युवतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढील तपास आर. टी. गोरे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office