Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Electric Cars : शानदार रेंज असणाऱ्या ‘या’ आहेत बेस्ट इलेक्ट्रिक कार! त्वरित खरेदी करा; वाचतील तुमचे इंधनाचे पैसे

Best Electric Cars : सध्या देशात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे इलेक्ट्रिक कार्सना चांगले दिवस आले आहेत. अशातच अनेक लोकप्रिय कंपन्या त्यांच्या नवीन कार लाँच करत आहेत. ग्राहकांचा कलही इलेक्ट्रिक कारकडे वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल आणि तुमच्यासमोर कोणती कार खरेदी करावी असा पेच निर्माण झाला असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण मार्केटमध्ये शानदार रेंज असणाऱ्या काही बेस्ट इलेक्ट्रिक कार आहेत ज्यात शानदार रेंज मिळत असून किंमतही कमी आहे. पहा यादी.

खरेदी करा या कार

Tata Nexon EV:

टाटाची Nexon EV Max 40.5 kWh बॅटरीने समर्थित असून ती एका चार्जवर 453 किमी पर्यंत चालते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 8 प्रकारांमध्ये आहे. या कारच्या किमतीबाबत बोलायचे झाले तर या कारची एक्स-शोरूम किंमत रु. 16.49 लाख पासून सुरू होऊन टॉप व्हेरियंटची किंमत रु. 19.54 लाख रुपये इतकी आहे.

Tigor EV:

Tigor EV मध्ये 26 kWh ची बॅटरी देण्यात आली ऑन ती सिंगल चार्जवर 315 किमी पर्यंत धावते. Tata Tigor EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये ते 13.75 लाख रुपये इतकी आहे.

Tata Tiago EV:

या इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये 19.2 KWh बॅटरी देण्यात आली असून ती एकदा पूर्ण चार्ज केल्यास एकूण 250 किमी पर्यंत चाते. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून कंपनीच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होऊन 11.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्राच्या कार्सना आहे मोठ्या प्रमाणात मागणी

Mahindra XUV400:

महिंद्राची ही इलेक्ट्रिक SUV 34.5 kWh बॅटरीद्वारे समर्थित असून ती सिंगल चार्जवर 375 किमी पर्यंत धावते. या कारची एक्स-शोरूम किंमत रु. 15.99 लाख पासून सुरूहोऊन त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत रु. 18.99 लाख इतकी आहे.

Citroen eC3:

या इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये 29.2 kWh बॅटरी देण्यात आली असून कारची रेंज एका चार्जवर 320 किमी पर्यंत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 12.76 लाख रुपये इतकी आहे.