Best Low Budget Destination : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय पण बजेट कमी आहे? ही आहेत भारतातील सर्वात स्वस्त आणि सुंदर ठिकाणे, पहा यादी
भारतातील काही ठिकाणे खूप सुंदर असून तुमचे बजेट कमी असले तरी काळजी करू नका, कारण कमी बजेटमध्ये तुम्हाला दुहेरी आनंद मिळू शकतो.
Best Low Budget Destination : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. अनेकजण या दिवसात आपल्या कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र अनेकांचे बजेट कमी असते. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हालाही फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण देशात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये सहज फिरायला जाऊ शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला यासाठी फक्त 8 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. कोणती आहेत ही ठिकाणे पहा सविस्तर यादी.
देशात सध्या एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळे असून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला असून अशा परिस्थितीत अनेकजण कुठे ना कुठे जाण्याचा विचार करत आहे.
प्रवास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. अनेक वेळा बजेट नसल्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाता येत नाही. परंतु देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला खर्च फक्त 8000 रुपये येईल.
हे आहेत सर्वोत्तम कमी बजेट डेस्टिनेशन
मॅक्लॉडगंज
समजा तुम्हाला सुंदर दऱ्यांमध्ये फिरायला आवडत असल्यास तुम्ही मॅक्लॉडगंजच्या सुंदर खोऱ्यांना भेट देऊ शकता. या सुंदर दृश्यांसोबतच तुम्हाला अनेक धार्मिक स्थळेही पाहायला मिळू शकतात. तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे.
अमृतसर
पंजाबमधील अमृतसर हे सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक असून येथील सुवर्ण मंदिर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. याशिवाय अमृतसरमधील वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, रामतीर्थ मंदिर, सद्दा पिंड, पार्टीशन म्युझियम ही ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळू शकतात.
लोणावळा
महाराष्ट्रातील लोणावळा हे एक सर्वात सुंदर हिल स्टेशन असून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. कमी बजेट असणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे असे ठिकाण आहे देशातीलच नाही तर जगभरातील लोकांना आकर्षित करत असते. या ठिकाणी तुम्हाला सुंदर धबधबा, ड्यूक्स नोज, पवना तलाव, कुणे धबधबा आणि भुशी डॅम सारखी सुंदर ठिकाणे पाहायला मिळू शकतात.
पुद्दुचेरी
भारतातील पुद्दुचेरी हा सर्वात प्रसिद्ध केंद्रशासित प्रदेश असून 8000 रुपयांच्या बजेटमध्ये या ठिकाणी एकापेक्षा एक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे तुम्हाला नैसर्गिक नजारे पाहायला मिळू शकतील तसेच अतिशय चविष्ट खाद्यपदार्थही येथे उपलब्ध आहेत. मुक्कामाची जागाही या ठिकाणी सहज आणि कमी खर्चात उपलब्ध आहे.
कन्याकुमारी
तामिळनाडूमधील कन्याकुमारी हे एक कमी बजेटचे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या ठिकाणी तुम्हाला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराचा अद्भुत संगम पाहायला मिळू शकतो.
या ठिकाणी अतिशय आकर्षक नारळाची झाडे आणि सुंदर भातशेती असल्याने जी तुमचे सर्व लक्ष वेधून घेते. येथे समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे उत्तम दृश्य पाहायला मिळते.
ऋषिकेश
भारतातील ऋषिकेश हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे वर्षभर पर्यटक येत असतात. याची चांगली गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला 8000 च्या बजेटमध्ये उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यासह अध्यात्माचा आनंद घेता येईल
ज्यांना धावपळीच्या जीवनापासून दूर जाऊन शांततेचे क्षण घालवायचे असतील त्यांच्यासाठी हे शहर उत्तम आहे. हे एक अतिशय परवडणारे ठिकाण असून येथे तुम्ही आरामात कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता.
उत्तराखंड
उत्तराखंड हे सर्वात अनोखे तसेच सुंदर ठिकाण आहे. इतकेच नाही तर ते देवभूमी म्हणूनही ओळखण्यात येते. येथे अनेक छोटी-मोठी हिल स्टेशन्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता. तसेच देशाबरोबरच परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येथे येत असतात.
नैनिताल हे देखील एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ज्या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यास उत्तम असून अजूनही जर तुम्ही इथे आला नसल्यास तुम्ही एकदा भेट द्या. स्वस्त असण्यासोबत हे एक सुंदर आणि उत्तम ठिकाण मानले जाते.
तर ही आहेत भारतातील 8 सुंदर ठिकाणे, येथे तुम्ही सुंदर नैसर्गिक वाद्यासह धार्मिक त्याशिवाय आध्यात्मिक पर्यटन करू शकता. जर तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीचा विचार करत असल्यास तुम्ही यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता.