Best Recharge Plan : सध्या नेटफ्लिक्स तसेच Disney+ Hotstar यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढला आहे. अनेकजण या प्लॅटफॉर्मसाठी पैसे मोजत आहेत. तर काही कंपन्या त्यांच्या ठराविक रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत वापरण्याची संधी देत आहेत.
अशीच संधी आता काही कंपन्यांच्या ग्राहकांना दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपन्या 200 एमबीपीएस स्पीड आणि 3300 जीबी डेटासह इतर अनेक शानदार फायदे देत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्लॅनच्या किमती ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे.
Airtel चा ब्रॉडबँड प्लॅन
भारती एअरटेलचा 200 एमबीपीएस प्लॅनची किंमत 999 रुपये इतकी आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना आता 200 Mbps ची डाउनलोड आणि अपलोड गती मिळत आहे. इतकेच नाही तर, वापरकर्त्यांना 3.3TB (3300 GB) मासिक डेटा आणि Disney+ Hotstar, Amazon Prime, Xtreme Premium, VIP Service, Apollo, FASTag आणि Wynk Premium सारखे अतिरिक्त फायदे दिले जात आहेत.
BSNL चा ब्रॉडबँड प्लॅन
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चे 200 Mbps चे दोन प्लॅन आहेत. यापैकी एक म्हणजे BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन 200 Mbps पर्यंत डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह येत आहे. या प्लॅन मध्ये ग्राहकांना एकूण 3.3TB (3300GB) डेटा दिला जात आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये Lionsgate, Disney+ Hotstar, Hungama, Sony Liv, Zee5, आणि YuppTV सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.
ACT चा ब्रॉडबँड प्लॅन
ACT प्रत्येक शहरांत 200 Mbps योजना ऑफर करत नसल्याने तुम्हाला सेवा तुमच्या शहरात उपलब्ध आहे की नाही हे कंपनीच्या वेबसाइटवर पाहावे लागेल. अहमदाबादमधील ACT लाइटनिंग प्लॅन ग्राहकांना 200 Mbps डाउनलोड आणि अपलोड गती देते. याची किंमत 999 रुपये प्रति महिना आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनसह सवलतीच्या दरात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आणि इतर OTT फायद्यांसह कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता मिळते.