Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Smartphones : स्वस्तात खरेदी करा 6000mAh बॅटरी असणारे शक्तिशाली फोन, किंमत फक्त..

Best Smartphones : भारतीय बाजारात स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. सर्वच कंपन्या आपल्या आगामी फोनमध्ये शानदार फीचर्स देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शानदार फीचर्स असल्याने या स्मार्टफोनच्या किमतीही जास्त आहेत. परंतु ज्यांचे बजेट कमी आहे त्यांना हे फोन खरेदी करता येत नाही. मात्र आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण 6000mAh बॅटरी असणारे शक्तिशाली फोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत

1. Realme C25

Realme चा हा फोन 6000mAh बॅटरीसह येत असून ज्याची Amazon वर त्याची किंमत 9,800 रुपये इतकी आहे. कंपनीकडून यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले, MediaTek Helio G70 प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

2. Infinix Hot 10S

या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी असून या फोनची किंमत सुमारे 9,999 रुपये इतकी आहे. यात 6.82-इंचाचा HD+ डिस्प्ले, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

3. Tecno Pova 2

या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली असून त्याची Amazon वर किंमत 8,499 रुपये इतकी आहे. यात 6.9-इंचाचा FHD+ डिस्प्ले, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप कांपनीकडून वापरकर्त्यांसाठी देण्यात आला आहे.

4. Realme Narzo 30A

या फोनमध्ये MediaTek Helio G85 दिला असून जो एक गेमिंग प्रोसेसर आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्राथमिक कॅमेरा 13MP चा आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.

5. Samsung Galaxy M12

हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 90Hz रिफ्रेश रेट आणि 6000mAh बॅटरीने सुसज्ज असून तुम्ही हा फोन सुमारे 10,999 रुपयांना खरेदी करू शकता.