Android users alert: अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सना (Android smartphone users) पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अँड्रॉइड युजर्सना 8 दुर्भावनापूर्ण अॅप्सबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. मात्र गुगलने (google) वेळीच हे अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले.
मात्र ज्यांनी हे अॅप (app) डाऊनलोड केले होते अशा अनेक युजर्सच्या मोबाईलमध्ये अजूनही हे अॅप्स असू शकतात. याशिवाय या अॅप्सच्या एपीके व्हर्जन्सही गुगलवर उपलब्ध आहेत. फ्रेंच संशोधक मॅक्सिम इंग्राओ (Maxim Ingrao) यांनी याबाबतचा इशारा दिला आहे.
येथे आज आपण त्या अॅप्सची संपूर्ण यादी जाणून घेणारआहोत जे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करावेत. हे अॅप्स दुर्भावनापूर्ण असल्याने तुमच्या फोनमधील वैयक्तिक डेटा (Personal data in the phone) आणि इतर तपशील चोरू शकतात. यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.
व्लॉग स्टार व्हिडीओ एडिटर (vlog star video editor) अॅप देखील या श्रेणीमध्ये ठेवले आहे. 1 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. याशिवाय जर तुम्ही क्रिएटिव्ह 3D लाँचर डाउनलोड केले असेल तर ते त्वरित हटवा. ते लाखो वेळा डाउनलोडही झाले आहे.
फोनमधून फनी कॅमेरा देखील त्वरित हटवा. नावाप्रमाणेच हे कॅमेरा अॅप कॅमेरा फिल्टर्स देते. हे 5 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. याशिवाय वॉव ब्युटी कॅमेरा अॅपही फोनमधून काढून टाका.
ब्युटी फिल्टरसह येणारे हे दुसरे कॅमेरा अॅप देखील आहे. हे 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. याशिवाय तुम्ही Gif Emoji Keyboard, Razer Keyboard & Theme, Freeglow Camera किंवा Coco camera v1.1 डाउनलोड केले असल्यास, हे अॅप्स लगेच काढून टाका.