अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतोय.

मात्र रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोनाची परिस्थिती अदयाप सुधारलेली नाही. अशातच डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट पसरली आहे. काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखं डेंग्यूही आपलं रुप बदलत आहे.

रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे ज्या रुग्णांचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

त्यांच्यातही डेंग्यूची काही लक्षणं पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स सातत्याने कमी होत आहे. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे.

अनेक रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यामध्ये फक्त व्हायरल फिव्हरची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यत: रक्तातील प्लेटलेट्स या एक लाख 50 ते चार लाखांपर्यंत असतात. मात्र आता डेंग्यूमुळे त्या वेगाने कमी होत आहेत.

बहुतांश भागात तापाने अनेक रुग्ण फणफणत आहेत. अक्षरशः डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापासून तीव— अंगदुखी जाणवत आहे. जीव नकोसा करणार्‍या अंगदुखीने रुग्ण वैतागले आहेत.

अशक्तपणाने धड उभारताही येत नसल्याचे वास्तव आहे. प्रत्येकजणच रक्त तपासणी करतो असे नाही. कोरोनाच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतरही ताप उतरत नसल्याने मग डेंग्यूच्या टेस्टसाठी पुन्हा खर्च करावा लागत आहे.