Aadhar Card : कोणतेही काम असो आता सरकारने आधार कार्ड बंधनकारक केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड हे सरकारी कागदपत्र आहे. अनेक ठिकाणी त्याचा वापर होत. शाळा, कॉलेज, किंवा बँकेत खाते चालू करण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे जर आता तुमच्याकडे आधार कार्डच नसेल तर तुमची अनेक कामे अडकू शकतात. आधार कार्ड बनवताना खूप काळजीपूर्वक त्यात माहिती भरावी कारण आता फक्त दोन स्थितीतच त्यावरचे नाव बदलता येते, काय आहे नियम जाणून घ्या.
दोन अटींमध्ये बदलता येते नाव
आता तुम्ही फक्त दोन अटींवर आधार कार्डमध्ये तुमचे नाव बदलू शकता. नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक नसताना प्रथमच बदलता येईल. जर एखाद्या महिलेचे लग्न झाले असेल आणि तिला तिचे आडनाव बदलायचे असल्यास ती आधार कार्ड अपडेट करू शकते.
हे लक्षात ठेवा की नावात बदल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येतो. तसेच आधार कार्डमध्ये लिंग चुकीच्या पद्धतीने टाकले असेल तर तुम्ही ते एकदाच बदलू शकता आणि तुम्ही आधार कार्डमध्ये जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता.
UIDAI ने केले आवाहन
तुम्ही आता सतत आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता, फोन नंबर, फोटो इत्यादी बदलू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे UIDAI ने सोशल मीडियावर ट्विट करून आधार कार्डधारकांना आवाहन केले आहे की, ‘जर तुमचा आधार दहा वर्षांपूर्वी तयार झाला असेल आणि तो अपडेट केला गेला नसेल, तर तुम्हाला विनंती आहे की तुमची ‘ओळखणीचा पुरावा’ आणि ‘पत्त्याचा पुरावा’ दस्तऐवज अपलोड करून त्याची पुन्हा पडताळणी करा. ऑनलाइन अपलोड करण्यासाठी 25 रुपये आहेत तर ऑफलाइनसाठी 50 रुपये शुल्क आहे.
UIDAI नुसार वैध संमती आणि प्रमाणीकरण प्रक्रियेनंतरच आधारशी निगडित सेवा प्रदान करण्यात येतात. आधारची पडताळणी mAadhaar अॅप किंवा आधार QR कोड स्कॅनर वापरून QR कोडच्या सर्व फॉर्मवर उपलब्ध आहे.