ताज्या बातम्या

Debit Credit Card : सावधान! हरवले असेल डेबिट-क्रेडिट कार्ड तर लगेच करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

Published by
Ahmednagarlive24 Office

Debit Credit Card : सध्याच्या धावपळीच्या काळात ऑनलाइन पेमेंटमुळे कार्ड वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तरीही अजूनही कार्डचा वापर सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही कार्डचा वापर केला जातो. काहीजण गडबडीत पर्स विसरतात किंवा काहीवेळा प्रवासात करत असताना पर्स किंवा पाकिट चोरीला जाते.

त्यात महत्त्वाची कागदपत्र असतात. तुमच्या एका लहान निष्काळजीपणामुळे तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. अनेकांना तर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, काही सुचत नाही. परंतु, तुम्ही काही महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे.

लक्षात ठेवा या गोष्टी

नंबर १

जर तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर, तुम्ही ते ब्लॉक केले पाहिजे. नेट बँकिंग अॅप किंवा कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही हे कार्ड ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुमच्या कार्डमधून होणारे कोणतेही चुकीचे व्यवहार टाळले जातात.

नंबर 2

जर तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ब्लॉक झाले असेल आणि त्याचवेळी तुमच्या कार्डवर असा कोणताही व्यवहार झाला आहे, जो तुम्ही केला नाही, तर तातडीने बँकेला सांगा. बँक तुम्हाला पूर्ण मदत करतेच. त्यामुळे तुम्ही हे नुकसान टाळू शकता.

नंबर 3

तुमच्या इतर सर्व कार्डांचे पिन नंबर, नेट बँकिंग पासवर्ड आणि UPI पिन नंबर बदला.

नंबर 4

तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक केले तर तुम्हाला नवीन कार्ड जारी करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कस्टमर केअर, नेट बँकिंग किंवा तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन नवीन कार्ड मिळवू शकता.

Ahmednagarlive24 Office