Banking Alert: : सावधान! तुम्हीही करत असाल ‘या’ चुका तर तुमचेही एका झटक्यात होईल बँक खाते रिकामे

Banking Alert : अनेकजण ऑनलाईन बँकिंग करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण असे व्यवहार करत असताना बँक अकाऊंटची काळजी घेणे गरजेचे असते.

कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण वाढले असून हॅकर्स सहज लोकांना लाखो घालत आहेत. स्मार्टफोनचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. आपल्या काही चुकांमुळे आपले बँक खाते क्षणात रिकामे होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

करू नका या चुका

क्रमांक 1

अनेकजण ऑनलाइन व्यवहार किंवा खरेदी करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ऑनलाइन व्यवहार करताना पासवर्ड टाकतात आणि त्यांचे खाते रिकामे होते. नेहमी व्यवहार करताना OTP पर्याय निवडा.

क्रमांक २

जर तुम्ही कोणत्याही वेबसाइट किंवा अॅपवरून ऑनलाइन खरेदी करता तेव्हा हॅकर्सतु मची बँकिंग माहिती जसे की डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, UPI आयडी इ. जतन करून ठेवतात.

क्रमांक 3

अनेकजण त्यांच्या ऑफिस किंवा सायबर कॅफे इत्यादी कोणत्याही ठिकाणी त्यांचे नेट बँकिंग लॉग इन करतात. तसेच अनेकजण त्यांच्या ऑफिसच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरूनही खरेदी करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर आजच ही सवय टाळा नाहीतर तुमचे खाते रिकामे झालेच म्हणून समजा.

क्रमांक 4

फसवणूक करणारे लोक अनेकदा कर्ज, केवायसी किंवा कोणत्याही लॉटरीच्या नावाखाली कॉल करून आमिष देतात त्यांच्या जाळ्यात अनेकजण अडकतात. आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक होते.