Cumin Side Effect : धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष दिले नाही तर तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देता. प्रत्येक स्वयंपाक घरात जिरे असते. काही भाज्यांमध्ये जिरे वापरले तर भाज्या खूप चवदार होतात.
इतकेच नाही तर जिरे खाण्याचे खूप फायदे असतात. तसेच जिरे खाण्याचे खूप तोटे आहेत. अनेकांना याचे तोटे माहिती नसतात त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुम्ही जास्त प्रमाणात जिरे खाल्ले तर काय तोटे असतात जाणून घ्या.
परंतु, तुम्हाला हे जिरे मोठ्या अडचणीत आणू शकते. जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर आजच ते बंद करा. कारण ते तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. याचे काय तोटे आहेत जाणून घेऊयात.
जास्त प्रमाणात जिरे खाल्ले तर काय होते?
अनेकदा जे लोक जास्त जिरे खातात त्यांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हालाही ऍलर्जीचा त्रास होत असेल तर जिरे कमी प्रमाणात खा. त्यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते.
जर तुम्ही जास्त जिरे खाल्ले तर तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते. काहीजण पोटातील गॅस काढण्यासाठी जिरे वापरतात. मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
अनेक महिला मासिक पाळीला उशीर करण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी लोक जिरे खातात. परंतु, याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर उलट्या आणि रक्तप्रवाहाची समस्या वेगाने निर्माण होते, जी तुमच्या शरीरासाठी घातक असते.
हे लक्षात ठेवा की गरोदरपणात जिरे जास्त प्रमाणात सेवन करू नये. जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर गर्भपाताचा त्रास होऊ शकतो, कारण जिऱ्याचा प्रभाव उष्ण असतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जिरे खूप हानिकारक आहे. त्यामुळे जर तुम्ही याचे जास्त सेवन करत असल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. कारण याच्या वापराने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन मधुमेह वाढत जातो.