Smartphone Bad Effects : सावधान! सकाळी उठल्यानंतर पाहत असाल स्मार्टफोन तर तुमचे होईल ‘हे’ नुकसान

Published on -

Smartphone Bad Effects : आपले आयुष्य स्मार्टफोनने व्यापून टाकले असून आपण सर्वजण दिवसरात्र त्याच्याजवळ घुटमळत असतो. स्मार्टफोनने सर्व कामे चटकन होत असली तरी त्याचे काही तोटेही आहेत.

अनेकांना झोपण्यापूर्वी किंवा झोपेतून उठल्यानंतर स्मार्टफोन पाहण्याची सवय असते. जर तुम्हाला ही सवय असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हीही अनेक आजारांना निमंत्रण द्याल.

तज्ज्ञांच्या मतांनुसार, सकाळी उठल्यावर लगेच स्मार्टफोन वापरू नये. कारण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. सकाळी स्मार्टफोन पाहिल्यावर आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो.

ताण वाढत जातो

आपल्या शरीरातील सकाळी कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते आणि कॉर्टिसोल हा तणाव संप्रेरक आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटते. परंतु,स्मार्टफोन घेतला की ताण वाढत जातो. तसेच शरीर आणि मेंदूच्या सामान्य प्रक्रियांतअडथळा निर्माण होतो.

डोकेदुखी आणि मान दुखणे

अभ्यासात डोकेदुखी आणि मान दुखण्याचे कारण म्हणजे स्मार्टफोनचा जास्त वापर. कारण तरुण लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करतात त्याशिवाय बराच वेळ एकाच स्थितीत बसून काम करतात. त्यामुळेच 20 ते 40 वयोगटातील व्यावसायिक लोकांमध्ये मणक्याशी निगडित समस्या आढळतात.

पाठीच्या कण्यातील समस्या

जास्त वेळ स्मार्टफोन वापरला तर मणक्यावर दबाव येतो. त्यामुळे तुमच्या अस्थिबंधनाचा धोका वाढतो. त्यामुळे स्नायू कडक होतात आणि डिस्कच्या समस्यांचा धोका वाढत जातो.

फॉलो करा या टिप्स

  • शक्यतो झोपण्याच्या जागेवर स्मार्टफोन ठेवू नका.
  • नाश्ता किंवा जेवण करताना स्मार्टफोन सोबत बाळगू नका.
  • रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या फोनचे इंटरनेट बंद करा,
  • सकाळी उठल्यानंतर स्मार्टफोनचा वापर टाळा.
  • तसेच सकाळी उठल्यानंतर किमान एक तास तरी स्मार्टफोन वापरू नका.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!