अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. यामुळे याला रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्य करीत आहे. मात्र या संतत संधी शोधात अनेक जण काळाबाजार करू लागले आहे.
आपल्या फायद्यासाठी वस्तूंच्या किंमतीमाह्ये वाढ करून चढ्या दराने ग्राहकांना विकू लागले आहे. मात्र याला आळा बसावा यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे.
केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीयंट बेसड सबसिडी) पॉलिसीनुसार युरिया खत (२६६ रुपये) वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली, असा दाखला देत एप्रिलनंतर काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खते, डीएपी, एसएसपी, एमओपी या खतांच्या किमतीत वाढ केली आहे.
लबाडी करणाऱ्या खतविक्रेत्यांना इशारा :- सद्यःस्थितीत बाजारात जुन्या दराची खते सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून आणि त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकरी बांधवांनी खते खरेदी करावीत.
छपाई किमतीपेक्षा जादा किमतीची आकारणी करता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दरांची खते त्याच दरात शेतकऱ्यांना विकणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्व खतविक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
तक्रार असल्यास संपर्क साधावा:- कुठलाही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी,
पंचायत समिती यांना रीतसर तक्रार करावी किंवा जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षास ०२४१- २३५३६९३ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, अशा आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.