Alert : सावधान! Netflix किंवा Amazon Prime चा पासवर्ड शेअर करत असाल तर तुम्हाला जावे लागेल जेलमध्ये

Alert : स्मार्टफोनमुळे सगळे जग मुठीत आले आहे. पाहिल्यासारखे आता एका चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावे लागत असायचे आताही काहीजण जातात.

परंतु, प्रमाण कमी आहे. कारण स्मार्टफोनमुळे OTT प्लॅटफॉर्म्सचा जास्त वापर होऊ लागला आहे. लाखो लोक Netflix किंवा Amazon Prime सारखे प्लॅटफॉर्म वापरत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Netflix च्या नियम आणि अटींमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की वापरकर्ते इतर कोणाशीही पासवर्ड शेअर करू शकत नाहीत. कॉपीराइटशी निगडित नियमांचे उल्लंघन होत असल्याने असे करणे बेकायदेशीर असल्याचे बौद्धिक संपदा कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तरीही वापरकर्ते नियमाचे उल्लंघन करत आहेत. परंतु, जर युजर्स असे केलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे.

गुन्ह्याच्या कक्षेत येते

IPO ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “पायरसी हा मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांसाठी सतत काळजीचा विषय राहिला असून इंटरनेटवरून कॉपीराइट केलेल्या प्रतिमा तुमच्या सोशल मीडिया खात्यांवर शेअर करणे किंवा अधिकृत चॅनेलशिवाय टीव्ही मालिका किंवा थेट क्रीडा इव्हेंटमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. तसेच हॅकिंग फायरस्टिक उपकरणे किंवा सबस्क्रिप्शन न भरता सामग्री पाहणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येते.

अजून केली नाही कारवाई

सध्या कोणत्याही यूजरवर कारवाई केली नाही. नेटफ्लिक्सने यापूर्वी असे आश्वासन दिले आहे की वापरकर्त्यांसाठी मित्रांसह खाती सामायिक करणे सोपे होईल. यामुळेच कंपनीने प्रोफाईल ट्रान्सफर आणि सब-खाते तयार करणे यासारखे फीचर्स नवीन खात्यात आणले आहेत.

पासवर्ड शेअरिंग बंद होणार

नेटफ्लिक्स लवकरच पासवर्ड शेअरिंग बंद करणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आता नवीन वर्षात म्हणजेच 2023 पासून खाते शेअरिंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. हा बदल पहिल्यांदा अमेरिकेच्या बाजारात पाहायला मिळतो. वापरकर्ते अॅड-ऑन पेमेंट करून त्यांच्या मित्रांसह खाते शेअर करू शकतील आणि ही किंमत मानक योजनेपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.