ताज्या बातम्या

Valentine Day Fraud Alert : सावधान! तुमचीही होऊ शकते प्रेमाच्या नावाखाली फसवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Valentine Day Fraud Alert : लवकरच नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी महिना संपणार आहे. अवघ्या काही दिवसातच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्याकडे प्रेमाचा महिना म्हणूनही पाहिले जाते. अनेकजण खास करून तरुणाई या महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करते.

या काळात ते चॉकलेट डे आणि टेडी डे सारखे डेज साजरा करतात. हे डेज साजरा करत असताना सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. कारण या काळात तुमची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

बनावट अॅपवर विश्वास ठेवू नका

सध्या डेटिंग अॅप्सचा वापर जास्त वाढला आहे. अनेकजण वेगवेगळ्या डेटिंग अॅप्सद्वारे त्यांचे प्रेम शोधतात. परंतु, अशा अॅपवर विश्वास ठेवू नका, कारण असे अॅप्स बनावट असून ते प्रेमाच्या नावाखाली लोकांना फसवतात. कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रेटिंग आणि पुनरावलोकने तपासा.

चुकूनही शेअर करू नका तुमचा OTP

अनेकांना डेट करण्यासाठी बनावट कॉल येत असतात. फसवणूक करणारे लोक यात समोरच्या व्यक्तींना त्यांच्या भावी जोडीदाराचे फोटो पाठवून किंवा त्यांच्या बोलण्यात अडकवून त्यांची फसवणूक करतात. तसेच ते तुमच्या मोबाईलवर ग्राहक म्हणून नोंदणीसाठी ओटीपी पाठवतात. परंतु चुकूनही तुमचा कोणताही OTP कोणाशीही शेअर करू नका. नाहीतर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

पेमेंट करण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे

अनेक अॅप्स तुम्हाला नोंदणी केल्यानंतर प्लॅन निवडण्यास सांगतात. विशेष म्हणजे यासाठी तुमच्याकडून पैसे घेतात. परंतु पेमेंट करण्यापूर्वी ते अॅप नीट तपासा, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत. कारण अशा अनेक बनावट अॅप्सद्वारे तुमची फसवणूक केली जाते. जर तुम्ही चॅट किंवा कॉलवर कोणाशी बोलत असाल तर समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गिफ्ट किंवा पैसे देणे टाळा.

अज्ञात लिंकवर क्लिक करू नका

जर तुम्हाला चांगला जोडीदार मिळेल असे सांगण्यासाठी अनेकांचे फोन येतात. ते तुमच्या मोबाईलवर नोंदणी करण्यासाठी एक लिंक पाठवतात. परंतु हे लक्षात ठेवा की अशा कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. कारण या लिंकवर क्लिक करताच तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता जास्त असते.

Ahmednagarlive24 Office