ताज्या बातम्या

भिडे गुरुजी म्हणाले… निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”आपण निर्लज्जपणात पहिल्या क्रमांकावर आहे.

जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्या, परवशता, गुलामी आणि दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा आहे. बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे.

हा निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. ते पुढे म्हणतात, ‘या देशात देशभक्तीचा, जाणिवेचा प्राण नाही.

कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती.

ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. पण, मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोनाचे कारण देत नकार दिला.

कोरोना हा काल्पनिक आहे, कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान बेधडक वक्तव्यांनी नेहमीच खळबळ उडवून देणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद पडणार आता हि येणारी वेळच ठरवणार आहे.

Ahmednagarlive24 Office