गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड ! जाणून घ्या त्यांच्याविषयी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- गुरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. गांधीनगरमध्ये आज रविवारी दुपारी 3 वाजता भाजप आमदारांची बैठक पार पडली.

या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते. नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

कोण आहेत भूपेंद्र पटेल? :- भूपेंद्र पटेल यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्याअगोदर ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण(एयूडीए)चे अध्यक्ष देखील होते. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपद सोडलं, तेव्हा त्यांनी अपल्या जागेवरून भूपेंद्र पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला होता.

एवढच नाही जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा १९९९-२००१ च्या दरम्यान पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तर, २००८-१० दरम्यान ते अहमदाबाद नगरपालिका शालेय बोर्डाचे उपाध्यक्ष होते. तर, २०१० ते २०१५ दरम्यान अहमदाबादच्याच थालतेज वार्डातून सदस्य होते.

भूपेंद्र पटेल यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांना हरवलं होतं. याबाबत एक घटना अशी देखील आहे

की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर, आनंदीबेन यांच्याच म्हणण्यानुसार भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी ही निवडणूक १ लाख १७ हजारापेक्षा अधिक मताने जिंकली होती.