जामखेड तालुक्यातील भुतवडा तलाव भरला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव शंभर टक्के भरला असून सांडवा ओसंडून वाहत आहे.

अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यात फक्त भुतवडा तलाव भरला आहे. इतर तलावातील पाणीसाठा २५ ते ३० टक्केच आहे. घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे हा तलाव भरला आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली.

भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट आहे. तर जोडतलावाची पाणी साठवणूक ५६ दशलक्ष घनफूट आहे. जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते.

दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दि. ४ रोजी दुपारी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाला तो रात्रभर सुरू होता.

त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव भरला आहे. रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे.

पण सध्या कोरोना महामारीमुळे पर्यटकाला तेथे जाण्यासाठी बंदी आहे. भुरेवाडी तलाव भरून रात्रीतच भुतवडा तलाव १०० टक्के भरला आहे. व मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे.