‘या’ प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,

भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आली आहे.

भाजप नेत्यांनी पीडित पूजा चव्हाणचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला.

तसंच कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका स्त्रीची संपूर्ण भारतात जाणून बुजून बदनामी करणाऱ्या संबंधित भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24