ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- नाशकातील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या करण्यात आली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते.

सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भजाप पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या कऱण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नाशकात आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरात झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्येने नाशकात खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office