अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती.
त्यानंतर आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरु करण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे की, 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे. एक वर्षांपूर्वी मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.
त्यानंतर आता कोरोनाचे प्रमाण राज्यात कमी झाल्याने त्या ठिकाणची माहिती घेत तेथील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून आठवड्यात बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता शाळा सुरु करण्याबाबत आज राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले.