अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित चार जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. व रविवारी 21 तारखेला निकाल लागेल. निकालानंतर खा. विखे हे गौप्यस्फोट करणार आहेत.
खा. डॉ. सुजय विखे हे रविवारी मतदानानंतर गौप्यस्फोट करणार असून आपली भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर स्पष्ट करणार आहोत असे त्यांनी अहमदनगर शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे आणि शिवाजीराव कर्डिले यांची समन्वय समिती स्थापन केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत पक्षविरहित निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.
कर्डिले हे समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांकडे गेले असतील असे सांगत त्यासंदर्भात 21 तारखेला बोलेल असे त्यांनी सांगितले.
खा. विखे यांच्या या विधानामुळे जिल्हा बँकेच्या निकालानंतर खा. विखे हे काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता आता जिल्ह्यातील नागरिकांना लागून आहे.