अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे.
भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस घ्यावा लागेल, असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. वेळेनुसार आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
तसेच भविष्यात विकसित होणाऱ्या कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट्सपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे. सेकेंड जनरेशनची लस इम्युनिटीसाठी उत्तम ठरेल.
कारण नवनव्या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरेल. वॅक्सीनच्या बूस्टर डोसचे ट्रायल सुरू झाले आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या मोहीमेला सुरुवात करावी लागेल, असे गुलेरिया म्हणाले.