अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यापुढे राजकारण आणि निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अधिनियमात तशी सुधारणा केली असून, संबंधित अध्यादेशाची प्रतसंस्थान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्याने संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अधिनियम २००४ अन्वये संस्थान प्रशासनाच्या दैनदिन कामकाजाबाबत अधिनियमातील
तरतुदीनुसार त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार त्यास मान्यता दिलेली आहे. सदर विनिमय प्रसिध्द करण्याबाबत संस्थान प्रशासनाने निर्देश दिलेत.