जिल्ह्यातील मोठी घटना ! दोघांच्या राहत्या घरावर जोरदार वीज कोसळली

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे.

यातच अशीच एक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील दोघांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. भेंडा येथील आबासाहेब तुपे व दीपक नवले या दोघांच्या घरावर वीज पडल्याची घटना दि.5 ऑक्टोबर रोजी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भेंडा परिसरात दि.5 रोजी सायंकाळी वारा-ढगांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली. यावेळी भेंडा बुद्रुक येथील फिटर आबासाहेब तुपे यांच्या घराचे जिन्यासाठी छतावर बांधलेल्या टॉवरवर वीज पडून भिंती फोडून वीज आरपार झाली.

तर भेंडा खुर्द येथे दीपक नवले यांचे घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीसाठी लावलेल्या लोखंडी स्टँडला विज येऊन आदळली.

त्यामुळे स्टॅण्ड खालील फरशी व स्लॅबचा थोडा भाग फुटला आहे. दोन्ही ठिकाणी सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. दरम्यान विजेच्या जोरदार आवाजाने तुपे व नवले कुटुंबातील सर्व सदस्य घाबरून गेले होते.