दुधाच्या दरात मोठी घसरण पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक संकटात

Ahmednagarlive24 office
Published:
Ranchers in crisis

जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूध दरात मोठी घसरण झाली असून, ४० रुपयांपर्यंत गेलेले दर ३२ रुपयांवर आले आहेत.

तर दुसरीकडे चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने दुधाळ जनावरे सांभाळायची कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे दुधव्यवसाय अडचणीत सापडला असून, सध्या हिरवा चाऱ्याचे वाढलेला आहेत, तर दुधाचे दर कमी झाले.

पशुखाद्याचे दर ही वाढल्यामुळे पशुपालक दुहेरी संकटात सापडला आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात सद्यःस्थितीत मका व उसाचा हिरव्या चारा सध्या दोन हजार ते तीन हजार रुपये टन, या दराने मिळत आहे. हिरवा चारा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांकडे दूध व्यवसाय करणारे शेतकरी वाटेल ते पैसे घ्या, पण चारा द्या, अशी विनंती करीत असल्याचे चित्र दहिगाव-ने, भाविनिमगाव, देवटाकळी,

भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर व मजलेशहर परिसरात आहे. मागील कित्येक वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

गतवर्षातील खरीपही गेले अन् रब्बीही गेले, अशी परिस्थितीत निर्माण झाल्याने शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. शहरटाकळी परिसरातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाई, म्हशीचा दुग्ध व्यवसाय करतात, त्यामुळे काही कुटुंबांचा उदारनिर्वाह दूध व्यवसायावर चालतो.

मात्र, सध्या चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने विकतचा चारा घेऊन पशुधन सांभाळणे मोठे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. पावसानेही दडी मारली असून, पशुखाद्याच्या दर वाढ झाली आहे. तर दुधाचे दर कमी झाल्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे.

शेतकरी पशुपालन व्यवसाय वाढण्याच्या तयारीत होते. मात्र, आता दर कमी झाल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे खरेदी केली, त्यासाठी जवळचे पैसे खर्च केले. तर काहींनी बँकेचे कर्ज व उसणवारीने पैसे घेऊन गाई, म्हशी खरेदी केल्या होत्या.

मात्र, आता चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने व उसाचेही भाव गगनाला भिडल्याने दुधाळ जनावरांनादेखील बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे, त्यामुळे जनावरे विकताही येईनात आणि ठेवताही येईनात, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी हैराण झाला आहेत.

आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूध दरात मोठी घसरण झाली असून, ४० रुपयापर्यंत गेलेले हे दर ३२ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र, पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe